सध्या थंडीचा मौसम चालू झाला आहे याची जाणीव लगेच झाली. तरीपण सुमीत ने गाडीच्या काचा सगळ्या खोलून ठेवल्या होता आणि मस्त मस्त थंडी थंडी हवा अंगावर घेत होता आणि आम्हाला पण घ्यायला लावत होता. तन्मय जरा बुजलेला वाटत होता कारण आमच्याबरोबर त्याचा पहिलाच आउटिंग होते आणि त्यात सुमीत त्याच्या डोल्बी आणि मोठ्या भारदार आवाजात डिस्कशन करत होता. त्यामुळे तन्मय जरा जास्तच शांत होता. चांदणी चौक सोडून गाडी पुढे आली आणि आमच्या गप्पा रंगात आल्या . इकडचे तिकडचे चालू होते. तन्मयला भूक लागली होती मला पण चहा आणि धुम्रपान दंडिका घेण्याची इच्छा होती. पण इतक्या सकाळी कुठे काही मिळेल जरा शंका होती. शेवटी मुळशीच्या जवळ एक छोटेसे दुकान उघडे दिसले. आत एक "अण्णा" सारखा दिसणारा "अण्णा" झोपला होता. त्याला अण्णा म्हणून उठविले आणि "खायला काय आहे?" असे विचारले. तो आधीच साखरझोपेत होता , नक्कीच काहीतरी रोमांटिक स्वप्न बघत असणार , त्यात सका-सकाळी ५ ला कोण खायला मागत आहे असा विचार करून आमच्याकडे तारवटलेल्या डोळ्यांनि बघितले आणि परत चादर मुस्काटून घेयुन झोपला . निर्मनुष्य जागी आपले दुकान सताड उघडे ठेऊन निश्चित होऊन झोपलेला मी पाहिलेला पहिला माणूस ! पुण्यात अशी बेफिकीरी कुठेच बघायला मिळणार नाही . सुखी माणूस !! . त्याला परत "अण्णा हो" म्हणून उठवला आणि २ बिस्कट पुडे घेतले आणि पुढे निघालो.
एव्हाना हळू हळू पूर्वेकडे उजेड पसरू लागला होता. आमचे टेन्शन वाढु लागले होते. अजुन जवळपास २५ कि. मी. ( काटकर न्हवे !! ) जायचे होते आणि आत्ताच सूर्योदयची चिह्णे दिसू लागली होती. सकाळी सूर्योदयपूर्वी ५ ते 10 मिनिटे जो रंगाचा खेळ असतो त्यासारखी अद्भुत आणि अप्रतिम होळी कुठेच शोधून सापडणार नाही. आणि तीच होळी आम्हाला कॅमेरयाने ठरलेल्या त्या जलाशाजवळ टीपायची होती पण आम्ही वाटेवर असतानाच सूर्योदय होत होता . कहानी में थोडा ट्विस्ट केला आणि मुळशी धरणाला लागून जो रोड आहे तिथेच सूर्योदय घ्याचा असे ठरले . नेहमीप्रमाणे मी ट्राइपॉड आणला नाही . सुमीत आणि तन्मय ट्राइपॉड वर कॅमरा सेट करून क्लिक करत होते. मी रोडला लागुन असणार्या एका छोट्या टेकडीवर चढलो आणि तिथून ४/५ फोटो घेतले. पण ट्राइपॉड नसल्यामुळे फोटो मधे बराच ब्लर आला. मनातल्या मनात 'बेटर लक नेक्स्ट टाइम' म्हणालो आणि खाली आलो.

विकीमापिया वरील माहितीप्रमाणे पुढे जवळच एक पठार आहे असे आधीच समजले होते. आणि तिथून कोंकण व्हॅली चा भन्नाट नजारा दिसतो एवढे नक्की होते. गर्द वनराई आणि त्यामधून जाणारा रस्ता आणि त्यात पहाटेची गुलाबी थंडी, बस्स आणि काय पाहिजे आयुष्यात असा विचार क्षणभर मनात आला , परत विचार केला अजुन आपल्याला बरेच काही करायचे आहे आणि ट्रान्स् मधे जाण्याचा मोह आवरला !!. सुमीत ने मधेच एक बॉम्ब टाकला त्याची म्हणजे त्याच्या कॅमेराची बॅटरी खतम होता आली आहे. शेवटचा एकच टॉवर दाखवत आहे. धन्य आहे रे !! त्याने कुठेतरी वाचलेले होते की बॅटरी गरम केल्यावर जरा जास्त वेळ चालते गाडीचा हीटर फुल्ल केला आणि बॅटरी त्याच्या समोर धरली , गुड आइडिया !! थोडे पुढे गेलो आणि ते पठार आले.. डाव्या हाताला..भरपूर मोठे पठार होते. शुमाकर च्या तोडिस तोड असा एक टर्न मारत सुमीतने गाडी पठारावर घेतली आणि आम्ही गाडीतून 'कॅमेरे' ट्राइपॉड आदी साहित्य घेऊन खाली उतरलो . पुढे जाउन जो काही निसर्गाचा काही कला अविष्कार आहे तो पाहून धन्य धन्य जाहलो . सह्याद्री च्या कणखरपणा , निसर्गाची शाल अंगावर घेउन सकाळच्या कोवळ्या उन्हात धुप खात बसला होता आणि आम्ही पामर त्याकडे बघत आमचे डोळे तृप्त करून घेत होतो. वॉव, सही, कूल, भन्नाट, मस्त, काटा, झकास असले टिपिकल फ्लिक्करचे कॉमेंट्स टाकत कॅमेरे सेट करून त्या भन्नाट निसर्ग अविष्काराचे फोटो काढू लागलो.सकाळचा कोवळा आणि सोनेरी प्रकाश सगळीकडे पडला होता आणि सगळे अगदी सोनेरी सोनेरी दिसत होते. अगदी ज्योनी लीवरला जरी तिथे उभा केला असता तरी तो पण १००%.सोनेरी दिसला असता. ही जागा बर्या पैकी उनटच्ड वाटत होती. इकडे तिकडे ऑब्जेक्ट शोधत क्लिक करणे चालूच होते. काही अप्रतिम लैंडस्कैप मिळाले. मेमोरी कार्ड भरत होते पण मन काही भरत न्हवते. इकडे तिकडे भटकताना तिथेच २/३मोकळ्या बाटल्या अर्थात मदिरेच्या दिसल्या आणि खात्री पटली की ही जागा उनटच्ड राहिली नाही. साले. एक जागा सुद्धा सोडत नाहीत. !!

आजपर्यंत फोटो मधे बघितलेला , शेवटी तो आमच्यासमोर होता. आणि त्याचे ते विस्तीर्ण स्वरुप आणि ते सौंदर्य पाहून फक्त वेड लागायची पाळी होती. गाड़ी पटकन साइडला लावली आणि आपापली एक्विपमेंट्स घेउन खाली उतरलो. सकाळचे कोवळे उन , मस्त बॅकग्राउंड ला डोंगर , शांत पाणी , आजुबाजुला गुरे चरत आहेत, अगदी स्वर्गीय नजारा होता . मनात परत विचार आला 'आणखी काय पाहिजे ' ? परत त्या विचाराला थांबवले 'अजुन बरेच काही करायचे आहे :) !!' . डोक्यात बरेचशे कोम्पोसिशन , फ्रेम , आर्टिस्टिक फ्रेम, लैंडस्कैप होते ते कैमरा मधे उतरून घेऊ लागलो . जवळ पास अर्धा एक तास कसा गेला ते समजले नाही. बरेचशे चांगले फोटो मिळाले .

