Tuesday, November 17, 2009

भुलेश्वर फोटोशूट !!!

............... आणि शेवटी भुलेश्वर ला जायचे ठरले.!! माझी फ़ार दिवसापासुनची इच्छा पुर्ण होणार होती. मी , विकास, सुमीत आणी सुमीतचा एक मित्र नील असे चारजण जाणार होतो. परंपरेनुसार सकाळी ४ वाजता जायचे ठरले होतेच. विकास मला पिक-अप करुन आम्ही दोघे हडपसरच्या पुलाजवळ थांबनार होतो. सुमित आणि नील तिथेच येणार होते. तिथे पोहोचलो तेव्हा ते दोघे वाट पहात होते. विकासची कार तिथेच लाउन सुमितच्या कार मधे स्थानापन्न झालो. नीलशी इंट्रोड्क्शन झाल्यानंतर असे समजले कि नील चि निक्कि (बायको !!) माहेरी गेली असल्यामुळे तो फ़्री होता. मला त्याचा फ़ार हेवा वाटला ;) . सही आहे !!. नेहमी प्रमाने आमच्या थापा चालु झाल्या. काही विषय इतके "ओले" असतात कि ते कितीहि चघळले तरी वाळत नाहीत :) . आमचे मराठीतुन जोक चालु होते आणि नीलला तर मराठी येत नव्हते त्यामुळे बरेचसे जोक्स तो मिस करत होता . नंतर आम्हीच हिंदीतुन बोलने चालु केले. पण मराठीतुन शब्द फ़िरवुन , वाक्ये उलटी पालटी करुन किंवा इतर मार्गे जी विनोद निर्मिति करता येते त्याची सर कशालाच नाही ...!!

अजुन सुर्योदयाला फ़ार वेळ होता. ह्डपसरच्या बाहेर आल्यावर चहा घ्यायचे ठरले. वाटेवर एका टपरी मधे चहा घेतला आणि निघालो. बोलता बोलता वाटेमधे जे "कावडी" नावाचे गाव आहे तिथे अगोदर जायचे ठरले . भुलेश्वरचे मंदिरामधे इतक्या लवकर जाउन काही उपयोग न्हवता कारण तिथे मंदिरामधे फोटोग्राफ़ी करायची तर भरपुर लाइट पाहिजे म्हणुन कावडीमधे सुर्योदय घ्यायचा ठरले आणि नंतर भुलेश्वर ला जायचे ठरले. पहिल्या टोल नाक्यावरुन पुढे गेल्यानंतर लेफ़्ट ला "कावडी" साठी फ़ाटा आहे. रजनीकांत स्टाइल ने टर्न मारत (होय शुमाकर लाजुन आता रिटायर झाला !!!! ) सुमितने गाडी कावडी च्या रोडला घेतली. त्या रोड ला दुतर्फ़ा उसाची आनी ईतर शेते असल्यामुळे थोडी जास्त थंडी जाणवली. घनदाट धुके आहे याचा अंदाज लगेचच येत होता. थोडे पुढे गेल्यावर रेल्वे क्रासिंग होते आणि नेमकी कुठली तरी रेल्वे जाणार असल्यामुळे फ़ाटक बंद होते. मौका आमच्याकडे चालुन आल्यावर आम्ही चौका मारायचे थोडेच राहणार होतो. पटापट आपापली ईक्विपमेंटस आणि ट्रायपोड्स घेउन खाली उतरलो. इथुन रेल्वेची ड्बल लाईन होती आणी नुकतेच पांढरे पट्टे आणि कलरींग केल्यामुळे ते लाईनमनचे छोटेसे घर आणि रेल्वे ट्रक फ़ारच सुंदर दिसत होते. अगदी "करण जोहर" च्या पिक्चर मधील द्रुश्य शोभत होते... उगाचच ईकडे तिकडे बघुन "शाहरुख खान" नसल्याची खात्री करुन घ्यावीशी वाटली. गाडी यायला भरपुर वेळ होता असे तो लाईनमन म्हणाला. दोन्हि ट्रक च्या मधे ट्रायपोड्स सेट करुन त्यावर आमचे कँमेरे लाउन रेल्वे यायची वाट पाहु लागलो. त्याअगोदर थोडे टेस्ट फ़ोटो घेतले. पुर्वेला बरोवर दोन्ही ट्रँकच्या मधे चंद्रकोर दिसत होती. ट्रकवर दुरवर एक सिग्नल होता. अगदी छान नजारा होता. लाईट फ़ारच कमी असल्यामुळे लो शटर स्पीड ला फ़ोटो काढावे लागणार होते. ३० सेकंद शटर स्पीड ठेउन काही फोटो घेतले. अगदी मनासारखे आले. थोड्या वेळाने रेल्वे आली आणि आम्ही त्याचे काही फ़ोटो काढ्ले. अगदी निट आले.



फ़ाटक उघडल्यानंतर आम्ही पुढे निघालो. अजुन सुर्योदयाला बराच वेळ होता. कावडी गावात प्रवेश केला , एका दुस-या माणसाचा अपवाद वगळता अजुन गाव तसे साखर झोपेतच होते. काँर्नरवर दोन चार कुत्री उगाचच आमच्या गाडी कडे तोंड करुन भुंकली. त्याचे काम ते ईमान-ईतबारे करत होते असे बहुतेक त्यांना त्यांच्या मालकाला दाखवायचे असेल.. . गावात पोहोचल्यावर गाडी पार्क केली आणी नदीकडे निघालो. सुमितने "हा ईलाका भुताखेताने भरलेला आहे" अशी खबर दिली. अर्थात त्यात घाबरण्यासारखे काहीच न्हवते. हल्ली टि. व्ही वर भुताखेताच्या इतक्या सिरीयल्स असतात आणि त्यात इतकी सुंदर सुंदर भुते दाखवली असतात ना कि आता त्यांची भिती न वाटता एक कुतुहल वाटते. आलीच एकादी पांढरी साडी नेसुन तर तिचे पण पोर्ट्रैट काढु..५० मि.मि. आहेच आपल्याकडे असा विचार केला... अगदी थोडा थोडा संधिप्रकाश पडु लागला होता. नदीवर दाट धुके पडले होते. काहीच स्पष्ट दिसत न्हवते. नीलने आणि मि मिळुन एक सिगारेट संपवली. आमच्या दोघांची "हि" हाँबी मँच झाल्यामुळे मला फ़ार बरे वाटले होते. पण आता माझ्याकडचा स्टाँक संपला होता आणी इथे बराच वेळ लागनार असल्यामुळे काहीतरी करुन ’काड्तुसे’ पैदा करणे महत्वाचे होते. अजुन सुर्योदयाला वेळ असल्यामुळे सुमित आणी नील दोघे मिळुन परत गावात गेले आणि एक पाकिट सिगारेट घेउन आले. आता मि आणी नील रिलँक्स झालो. :)
नदीवरचे धुके हटायला तयार न्हवते , दुरून वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत होते.मला तर सगळे पक्षी बदकच आहेत असा भास होत होता. काहीतरी विचित्र आवाज काढत होते. ते ऐकुन विकास ने तो आवाज कशाचा असु शकेल याचा अंदाज केला आणि हसुन हसुन पुरेवाट झाली ,अर्थातच ते इथे सांगणे उचीत असनार नाही. आमचा हास्याचा गडगडाट ऐकुन गावक-यांची भुताखेताविषयीची समजुत आणखी द्रुढ झाली असणार ह्यात काहीच शंका नाही.


एव्हाना अगदी थोडा थोडा उजेड पडु लागला होता. संथ वाहणारी नदी , टिपिकल टाईपचा तो पुल. दाट धुके, पक्षांचे आवाज ( :) ) एकंदरीत वातावरण एकदम झक्कास होते. नदीचे काही फ़ोटॊ घेतले , पक्षांचे फ़ोटो मिळने शक्यच न्हवते कारण आमची म्हनजे आमच्या कँमेरयांची रेंज तेवढी न्हवती. सुमित कडे नाही म्हनायला सिग्माची ३०० मि. मि . (बरोबर ना रे ?) लेन्स होती पण धुक्यामुळे त्याचा पण एवढा उपयोग होत न्हवता. त्यावर पुन्हा डिस्कशन झाले आणी आम्ही सगळ्यांनी अंदाजे ४०० मि. मि पर्यन्तची लेन्स पाहिजेच असे म्हणून तिला मनातल्या मनात विश लिस्ट मधे अँड केली. एक क्षण असे वाटले की ते सगळे पक्षी आमच्या कडे बघुन किंवा आम्हाला उद्देशुनच ह्सत आहेत असे वाटले.. ते विचार करत असतील "एवढ्या उचापती करुनसुद्धा कसा तुम्ही आमचा फ़ोटो काढु शकला नाही ? " .. फ़्रस्ट्रेशन मधे एक सिगारेट संपवली. १ का २ / ३ झाल्या असतील..... असो... हळु हळु नदीवर "ससे"(प्लीज इथे विचारु नका ससे म्हणजे काय ते !!) यायला चालु झाले होते.. त्या आत त्यांना डिस्टर्ब नको म्हनुन तिथुन निघायचे ठरवले... !! सुर्योदय झाला होता आणि धुक्यामुळे आम्हाला सुर्योदयातला "सु" पण दिसला न्हवता..!आता आमचा भुलेश्वर चा प्रवास चालु झाला होता. परत त्याच रेल्वे क्राँसिंग ला थांबावे लागले. आता बरयापैकी उजेड झाला होता पण धुके अजुन होते. त्यात तो नुकताच कलर केलेला रेल्वे ट्रँक आणि रेल्वे आणी लाईनमनची ती छोटिशी खोली एकदम मस्त कँपोझिशन सापडले. अगदी मनासारखे.!!



तिथून पुढे निघालो . सोलापुर रोड ला लागलो. नील पन आता चांगलाच मिसळला होता. माझा आणी त्याचा "छंद" मँच झाल्यामुळे आमचे तर अगोदरच जमले होते. हाईवे असल्यामुळे सुमितला एक नवा उत्साह चढला होता आणि गाडी १०० ने तरी पळवत होता... !! वाटेत खामगाव मधे थांबुन थोडे स्नँक्स आणी चहा घेतला आणी परत निघालो. आता आमचे "अँबस्ट्रँक्ट फ़ोटॊग्राफ़ी" मधे काय काय येउ शकते याबद्द्ल डिस्कशन चालु होते आणी हसुन हसुन पुरेवाट होत होती. काही "ओले" विषय साथीला होतेच त्यात भर टाकायला... रस्ता थोडा खराब होता पन सुमित सफ़ाईदारपणे गाडी घेत होता(!!). भुलेश्वर च्या मंदीराजवळ आलॊ आणी एका कटाक्षात मंदिराची भव्यता समजुन आली. मंदिराचा पसारा पुर्व- पश्चिम असा अवाढव्य होता. त्यावरचे कळसच मंदिराच्या भव्यतेची साक्ष देत होते. आज रविवार असल्यामुळे थोडि गर्दी असेल असा अंदाज होता पण अजुन तरी कोणी दिसत न्हवते. नेहमी प्रमाणे एक ’अण्णा’ त्याच्या टपरीची कम होटेल ची मांडणी करत होता. तो आत्ताच आला होता असे दिसले. आकाशात थोडेसे ढग होते आणि त्यामुळेच कि काय उन जास्त हार्ष(!) वाटत न्हवते. मंदिराच्या मागे एक बी.एस.एन.एल. चा टाँवर होता. तिकडे गेलो. तिथे कुणीतरी कर्मचारी असेल तर त्याची परवानगी घेउन टाँवरवर चढुन काही फ़ोटो काढावे असा बेत होता. पण खाली ज्या ३/४ खोल्याची बिल्डिंग होती तिला कुलुप होते. आणी ते चांगलेच गंजलेले दिसत होते . ह्याचा अर्थ इथे कुणीही नसणार हे ग्रुहित धरुन आम्ही टाँवर च्या दिशेने गेलो. नंतर कळाले कि हा टाँवर बंद पड्लेला आहे आणी बि.एस.एन.एल ला त्याची काही गरज न्हवती. म्हनुण तो गंजण्यासाठी सोडुन देण्यात आला आहे. भोंगळ सरकारी कामाचा एक आदर्श नमुना !!!

टाँवरची पहाणी केल्यानंतर असे दिसुन आले कि याला वरती जाण्यासाठी ज्या पाय-या असतात त्या जवळपास २०/३० फ़ुटावरुन चालु होतात. सरकारी लोक खरच हुशार असतात...तुर्तास तो प्लँन साइड्ला ठेउन आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. "अण्णा" कडे चहा घेतला आणी मंदिरात प्रवेश केला. ते भव्य दगडी बांधकाम पाहुन आवाक होण्याची वेळ आली. मंदिरात प्रवेश करण्यासाठी दक्षिण आणी पश्चिमेकडुन बोळवजा दरवाजे आहेत आणि उत्तरेकडून मुख्य दरवाजा आहे. आत गेल्यानंतर प्रथमदर्शनी कुणीही चाट पडावे असे द्रुश्य होते. भव्य दगडाचे खांब आणी अचुक आणि प्रमाणबध्द अश्या मुर्त्या पाहुण हैराण झालो. प्रथम लांबुनच दर्शन घेतले. कँमेरा काढुन त्यात एक एक मुर्ति टिपु लागलो.





भंगलेल्या अवस्थेतील त्या मुर्त्या पाहुन फ़ार वाईट वाटले. पण त्या मुर्त्या अजुन खुपच सुंदर दिसत होत्या. विशेष म्हणजे जवळपास सर्वच मुर्त्या एकाच प्रमानाच्या व अगदी रेखिव होत्या. वेगवेगळे फ़्रेम्स , कँपोझिशन्स , अँगल्स लाउन बरेचशे फ़ोटो काढले. त्यात सुर्याची किरणे मंदिरात पडत होती आणी क्षणाक्षणाला वेगवेगळे कँपोझिशन्स मिळत होते. ५० मि मि लेन्स असल्यामुळे अगदी अप्रतिम फ़ोटॊ मिळत होते. फ़ोटॊ काढत काढत मंदिराला दोन फ़े_या मारल्या पण मन काही भरत न्हवते. प्रत्येक वेळी नविन काहीतरी मिळाल्याचा आनंद होत होत. तिस_या फ़ेरिला १८-५५ मि मि चि लेन्स लावली आणि लो अँगल ने काही फ़ोटो काढत परत एक पुर्ण फ़ेरी मारली.


माझी पक्की खात्री झाली की इथे दिवसभर जरी थांबलो तरीही प्रत्येक वेळी नविनच फ़ोटॊ मिळेल. दिवसभर सुर्यकिरणांचा हा खेळ चालुच राहील. जवळपास २ तासांच्या फ़ोटोशेषन नंतर लक्षात आले कि बाकिची मंडळी गायब आहेत. बाहेर आल्यानंतर समजले कि सगळी वरतीच आहेत. परत वर जाउन काही लँन्ड स्केपस घेतले. बर-याच वेळाने मंदिरच्या बाहेर आलो. त्या अण्णाला भेळ आणी चहा सांगितले आणि थोडा वेळ रेस्ट करत बसलो. मागच्या वेळी जेजुरीला जसे १ मिनिटात फ़ोटो काढुन देनारे होते तसाच एक इथे पण भेटला. इंट्ररेस्टींग माणूस होता.
पोटपुजा झाल्यानंतर परत टाँवर च्या दिशेने निघालो. कसेबसे करुन वरच्या पाय-या पर्य़न्त जरी पोहोचलो तरी पुढ्चे काम एवढे अवघड वाटत न्हवते. त्या बिल्डिंगपासुन टाँवर पर्यन्त लोखंडी पिलर टाकले होते आणी तोच एक रस्ता होता २०/३० फ़ुट वर असणा-या पाय-यापर्यन्त जाण्याचा. वरती चढावे का नको असे करत करत शेवटी मनाचा निर्धार केला आणि मि वर जाण्याचा निर्णय घेतला. मला खात्री होती वर जाउन जे काही फ़ोटोज मिळातील ते भन्नाटच असणार.
"सेफ़ लाईफ़ जगण्याच्या नादात आपन ब-याचदा असले थ्रिल अनुभवायला कचरतो आणि जगणे मिळमिळीत करुन टाकतो". अर्थात हा माझा विचार आहे. तुमचे विचार असाच असला पहिजे असे काही नाही. तसेही झाडावर चढुन किंवा असले उद्योग करुन बरेच वर्ष झाली होती. त्यामुळे लहानपनीचे असले प्रसंग आजहि नजरेसमोर तरळतात आणी आपण उगाच मोठे झालो वैगेरे वैगेरे असे विचार मनात येतात. शेवटी मनाचा हिय्या करुन जँकी चेन स्टाईलने खिड्क्यावरुन बिल्डींगवर चढलो. खालुन हे तिघे "मोरल सपोर्ट" देतच होते. :) . बिल्डींगपासुन टाँवर १०-१५ फ़ुट असेल. दोन मोठे अँगल च्या साहाय्याने शेवटी त्या पाय-यापर्यन्त पोहोचलो. कपड्यांची वाट लागली होती. अर्थात ते ग्रुहीत धरुनच मिशन वर निघालो होतो. एकदाचे पाय-यापर्यन्त पोहोचलो आणि आता काय सगळे सोपे आहे या अविर्भावत एक एक पायरी चढु लागलो. थोडे वर गेल्यानंतर बाजुला एक प्लँटफ़ाँर्म केलेला दिसला. थोडी दमछाक झाली होती म्हनून २ मिनीटे रेस्ट कराबे असा विचार केला. खाली पाहिले आणी त्या क्षणी मी जी काही स्टंट्बाजी करत होतो त्याचा अंदाज आला.
खाली हे "त्रिमुर्ति पथक" माझा आत्मविश्वास वाढवत होते. आणि मि त्या जोरावर वर चाललो होते. नाहि म्हणाले तरी मनात थोडी भिती वाटत होतीच. टाँवर सुस्थितित असेल का ? भुंकंप झाला तर ? कुणी बि.एस.एन,एल, चा कर्मचारी तर नाही ना येनार?. असे बरेच काही डोक्यात येत होते.तसा आमचा स्वताबद्द्लचा अनुभव हा फ़ारसा चांगला नाही. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकानी हजर राहणा-यांच्या यादीत माझा पहिला नंबर आहे असा माझा ठाम विश्वास आहे. :) . त्यामुळे ऐन वेळी काही पोपट होऊ नये एवढीच माझी इच्छा होती. एकदा वर बघितले आणि परत ठरवले आता इथेपर्यत आलो आहेच तर एकदाचे काम फ़त्ते करुन टाकु.
असे समजा कि मि जवळपास दुस-या मजल्यावर होतो. आणी ज्या प्लँटफ़ाँर्म पर्यन्त जायचे होते तो जवळच दिसत होता. परत वरती जाण्यास सुरुवात केली. हे अंतर दिसायला जरी जवळ असले तरी जवळपास १० ते ११ व्या मजल्यापर्यंतचे होते हे परत समजले. हळु हळु सावधपणे एक एक पायरी हाताने निट ओढुन तपासत होतो आणी मगच वर पाउल ठेवत होतो. अधुन मधुन मंदिराकडे आणी खाली तिरका कटाक्ष टाकत होतो. एव्हाना मी ही जी काही स्टंट्बाजी करत होतो त्याची व्याप्ती दर पावला पावलाला माझ्या लक्षात येत होती. हवा टाईट होणे... !! नानी याद आणे !! असले तत्सम वाक्प्रचार माझ्या मनात उगाचच डोकावुन मला वाकुल्या दाखवत आहेत असे वाटत होते.
शेवटी एकदाचा तिथे पोहोचलो आणि सुट्केचा निश्वास टाकला. मनात इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला ’माउंटन ड्यु’ ची सुद्धा गरज लागत नाही. एकदा सभोवतालचे रमणिय द्रुश्य पाहुन त्या प्लँटफ़ाँर्मवरुन सावधपणे चालत मंदिराच्या बाजुला गेलो . प्लँटफ़ाँर्म जेमतेम दिड फ़ुट रुंद आणी पाच फ़ूट लांब असेल. फ़टाफ़ट ७/८ फ़ोटो काढले आणि परत फ़िरलो.



कँमेरा खांद्यावरुन मागच्या साईड्ला टाकला. आणि परतीचा प्रवास चालु केला. चढण्यापेक्षा उतरताना जास्त त्रास होत होता. कारण पाय गुढग्यातुन दुमडुन खालच्या पायरीवर जावे लागत असल्यामुळे ते थोडे त्रासदायक होते. मनासारखे फ़ोटो मिळाले तर होतेच पण त्यापेक्षा जास्त अजुन आपण रेस मधे आहे, याचाच आनंद जास्त होता. खालुन हे सपोर्ट देतच होते. एक एक पायरी करत करत शेवटी एकदाचा खाली आलो. अँगल वरुन सावकाश खाली उतरलो आणी मिशन निट पार पाड्ले याचा आनंद झाला. तिघेजण फ़ोटो पाहुन खुष झाले . पण वरती जाण्याबद्दल त्यांची मनस्थिती द्विधा होती. जाण्याची इछ्चा तर तिघांचीही दिसत होती. शेवटी सुमित वरती चढला. आनी सावकाशपणे जवळपास दुस-या मजल्यावर असणा-या प्लँटफ़ाँर्मवर जाउन थांबला. नंतर नील आणि विकास ला पण स्फुरण चढले. ते पण वरती गेले. विकासने मात्र मी जिथेपर्यंत गेलो होतो तिथेपर्यंत जाउन फ़ोटो काढ्ले आणी निट परत आला. हे मंदिराचे फ़ोटो जे वर जाउन काढले होते ते कंपोझिशन फ़क्त मी आणि विकासच्या कडेच आहे हा विचार पण काही कमी सुखावणारा न्हवता. एकंदरीत फ़ारच थ्रिलिंग एक्स्पिरियंन्स होता तो. पुढे कधितरी ह्याच स्पाँट वरुन सुर्योदय घ्यायचा असे पण ठरले.
एव्हाना दुपारचे २ तरी वाजले असतील. एकंदरीत ह्या फ़ोटोशुट मधे भन्नाट मजा आली होती. परत एकदा लवकरच इकडे यायचे नक्की करुन परतीचा प्रवास सुरु केला.....!!







Tuesday, November 10, 2009

जेजुरी फ़ोटो शुट !!!

नेहमीप्रमाणे वीकेन्ड साठी क्लिकेबल जागा शोधने चालु होते. दिनेश सरानी मागे एकदा जेजुरी चे नाव सुचविले होते. सुमीत ने पण तेच नाव सुचविले . विकास ने पण तेच नाव घेतले( लग्नात घेतात ते न्हवे ! ) शेवटी तेच ठरले, दोन Nikonians बोलल्यावर एक canonian काय बोलणार बिचारा. दिनेश सराना मेल टाकला. पण ते दुसरीकडे बिझी असल्यामुळे नंतर कन्फर्म सांगतो म्हणाले. तन्मय जिवाची मुंबई करण्यासाठी जाणार होता त्यामुळे त्याचे रद्द झाले. संजिथ आका सन्चु पण येणार होता. पण ११ व्या तासाला तो "drop out" झाला असे विकास म्हणाला , मला "knock out" झाला असे ऐकु आले. शुक्रवारी किंवा शनिवारी कधी कधी मला असेच वेगळे ऐकु येते.... !! असो. भुलेश्वरला या वीक मधे पण नाही ठरले :( . बेटर लक नेक्स्ट टाइम !!

रविवार चा दिवस ठरला. नेहमी प्रमाणे भल्या पहाटे जायचे ठरले. ऎवढी एक चांगली सवय लागली आहे. लवकर उठ्ण्याची ....! आमचा एक नियम आहे. जो पहिला उठतो त्याने सगळ्याना फोन करुन उठ्वायचे आणि ह्यावेळी चक्क मी उठलो होतो, सगळ्याना फोन टाकला. सुमित डायरेक्ट सासवड मधे येणार होता. विकास ठरल्याप्रमाणे उशिरा आला आणि आम्ही सासवड च्या दिशेने कोंढवा मार्गे निघालो. ठरलेल्या ठिकाणी सुमित थांबला होता. साहेब आज एकदम "चकोट" मधे आले होते. कुर्ता आणि पायजमा घालुन. राजकुमार जणू !! , आम्हि आपले तसेच उठुन सापडेल ते अंगावर घालुन आलो होतो. मावळे दिसत होतो. :) . सुमितची कार तिथेच पेट्रोल पंप जवळ लावली आणि निघालो. थंडी काहीच जाणवत न्हवती, दिवे घाट पार केला. अजुन सुर्योदयाला भरपुर अवकाश होता. काहीच दिसत नसल्यामुळे घाटातुन मस्तानी (तलाव !! ) दिसण्याची शक्याताच न्हवती. त्यामुळे पुढे निघालो. मि एकटा Canon वाला असल्यामुळे हे दोघे फ़ार्मात होते. मि अगोदरच " Nikon is great camera !!" म्हणुन विषय मिट्वुन टाकला. (परत सापडालच बेट्यानो !!)

"ईकड्च्या तिकड्च्या" गप्पा मारत जेजुरी पर्य़न्त पोहोचलो. तिथेच एका चहाच्या टपरीत चहा आणि बिस्किट घेतले. होटलवाल्याकडे बघितल्यावर मला मुळशि चा 'आन्ना ' आठवला . पान हां बरया पैकी ' सिरिअस आन्ना' दिसत होता. पुर्वेकडे हळु हळु रंगछटा यायला चालु झाल्या होत्या. पट्कन गाड़ी पार्क करुन मंदिरात जाण्यासाठी वर चढु लागलो. गर्दी नसेल असे वाट्ले होते पण भरपुर भाविक लोक होते. वातावरण एकदम मंगलमय आणि प्रसन्न होते. पुर्वेला तसे भरपुर ढग होते त्यामुळे सुर्योदय निट मिळेल का नाहि ही चिंता होतीच . १० मिनिटात पायरया चढून मंदिरात पोहोचलो.

सकाळच्या प्रसन्न वेळी लाउड स्पिकर वर आरती लावली होती. सुर्यौदय , आरती, ’येळकोट येळकोट जय मल्हार ’ चा जयघोष , हया सर्व गोष्टींमुळे अगदी भारावुन गेल्यासारखे गेलो होतो. मन एकदम प्रसन्न झाले होते. घरुन तसेच उठुन आल्यामुळे लांबुनच पायरीला हात लाउन पाया पड्लो. माझ्या मते मनात भक्ति असेल तर तुम्हाला मंदिरात गेलेच पाहिजे असे काहि नाही. अर्थात्त ज्याच्या त्याच्या मानन्याचा प्रश्न आहे.

एव्हाना सुर्योदय झाला होता, ढग होतेच पण त्यामुळे किरणांच्या छटा आणखीनच सुंदर दिसत होत्या. पहिल्यादा १८-५५ म.म. (18-55mm ) ने मंदिराचे काही फोटो काढ्ले. ह्या मंदिराच्या चहुबाजुंनी तट्बंदी आहे आणी मंदिरातुन वरती जाण्यासाठी अरुंद असे बोळ आहेत. त्यातुन जाताना अगदी पुरातन काळात गेल्यासारखे वाट्ते. तट्बंदी वरुन चोहोबाजुचा अप्रतिम नजारा दिसतो. पुर्वेला सुर्य रंगांची उधळन करत होता आणि बाजुला दोन भगवे ध्वज दिमाखात फ़डकत होते. मंदिरच्या उत्तर-पुर्व दिशेला मल्हार सागर नावाचे मोठे धरण आहे आणी पुर्व-दक्षिणेला श्रीमंत बाजीराव पेशवे तलाव आहे. तसेच मंदिराच्या उत्तरेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव आहे. तट्बंदीवरुन मंदिराला पुर्ण प्रदक्षिणा घालता येते. सुर्योदय झाला होता. आम्ही तिघेही जण फ़ोटॊ काढण्यात मश्गुल झालो होतो. काहि भन्नाट फ़ोटो मिळाले. तट्बंदीवर जवळपास अर्धा तास घालवल्यावर खाली आलो .



भाविकांची गर्दी हळु हळु वाढत होती. भंडारा हवेत उधळला जात होता. मधेच मोठय़ाने ’येळकोट येळकोट जय मल्हार ’ चा जयघोष होत होता. सुमित आत जाउन दर्शन घेउन आला . विकास त्याच्या नविन घेतलेल्या स्ट्रोबचे टेस्टिंग एका लहान मुलावर घेत होता. त्याचे रिझल्ट्स चांगले आलेले पाहुन मी आणी सुमितने हे नविन 'हत्यार' आमच्या Wshlist मधे (मनात नसताना ) टाकुन दिले. फोटोग्राफ़ी मधे हाच प्रोब्लेम आहे, नविन equipmemts ची भूक काही सरत नाही .

आता ५०म.म. (50mm prime) ने थोडे पोर्ट्रेट काढावे असा विचार केला .गर्दी वाढतच होती . मधेच एका आजीबाईनी विकासला विचारले. "एका फोटॊचे किती रुपये घेणार आणि किती वेळात फोटो देणार ? ". "नाही हो आजी मी तसला फोटोग्राफ्रर नाहिये !! मि छंद म्हणुन फोटोग्राफ्री करतॊ ! " विकास चे उत्तर . आजीबाई आमच्याकडे बघत म्हणाल्या " अच्छा ठिक आहे मी त्यांना विचारते !!". त्यावर विकास म्हणाला "ते सुद्धा माझ्याबरोबरच आले आहेत !!"....



बरेचशे पोर्ट्रैट मिळाले . एव्हाना बराच लाईट झाला होता. त्यामुळे खाली उतरायचे ठरले. खाली येताना फ़ोटोगिरि चालुच होती. वाटेत बरेचशे "So Called-photographers" दिसले जे फ़ोटो काढुन एक मिनिटात फोटो प्रिंट करुन देत होते. फ़क्त्त २० रुपयात. आयडिया छान आहे ... !! खाली आल्यानंतर एका छोट्याश्या होटेल मधे थोडी पोट्पुजा केली . पुढ्च्या वीक डेस्टीनेशन बद्दल ठरवु लागलो. अजुन पर्यत तर काही ठरले नाही. मार्केट मधे थोडा वेळ घालवला आणि थोड्या वेळाने परतीचा प्रवास चालु केला.

नेहमीप्रमाणे आमच्या बात्या चालुच होत्या. दिवे घाटात थोडा वेळ थांबुन फ़ोटॊ काढ्ले. वारकरी लोकांचे जथ्थे होते जे आळंदीला निघाले होते. परत पुढ्च्या वीक चे प्लनिंग करत करत परतीचा प्रवास चालु केला . एकंदरीत छान बाईट्स मिळाले होते ह्या फोटोशुट मधे.


ज्याना
३/४ तासाचे quick फोटोशुट करायचे आहे अशांसाठी जेजुरी हा उत्तम पर्याय आहे. wikimapia वरील जेजुरी चे लोकेशन खालीलप्रमाणे आहे.
http://wikimapia.org/#lat=18.2725124&lon=74.1605043&z=16&l=0&m=b

पुन्हा भेटूच ...!!

Wednesday, November 4, 2009

मुळशी धरण फोटोशूट !!

जवळपास १ महिना फोटोग्राफी न करता आल्यामुळे ( दिवाळी एट्सेटरा ) ह्या वीकेंडला फोटोशूटला नक्की जायचे असे ठरवून सर्चिंगला लागलो. बरेच दिवस झाले डोक्यात भुलेश्वरला जायचे असे ठरवलेले होते. सुमीतला पिंग केले आणि त्याने एक स्पॉट सुचवीला. मुळशी धरणाजवळ एक दुसरे छान छान आणि छोटे छोटे धरण आहे म्हणाला . पंकजने काढलेले तिथले काढलेले फोटो डोक्यात पिंगा घालत होतेच. शेवटी स्पॉट ठरला आणि कोणी येते का ह्याची चाचपणी चालू केली, विकास आउट ऑफ स्टेशन जाणार होता ( (हा आजकाल सारखा घरी पळतो !! लवकरच लग्न करणार असे दिसते !!) . बक्या ( आका अनिरुद्धा ) बिज़ी होता. शेवटी तन्मय साहा सापडला, "फोटोशूट करताना मी सिगरेट पिलो तर चालेल ना ?" तन्मयचा इंग्लिश मधून निरागस प्रश्न, " चालणार नाही, पळेल" माझे इंग्लिश मधून वाकडे उत्तर, मला सुद्धा कुणी पार्ट्नर भेटत नाही त्यासाठी त्यामुळे मला परमानंद जाहला !! . रविवारी भल्या पहाटे ४ ला जायचे ठरले. ४.२० ला सुमीतचा फोन आला , कुठे आहेस ? आब्वियस्ली घरीच असणार ना ? तरी पण ? १५ मिनिटात सुमीत आणि तन्मय , सुमीत च्या इंडिका मधून आले. बसून निघालो .
सध्या थंडीचा मौसम चालू झाला आहे याची जाणीव लगेच झाली. तरीपण सुमीत ने गाडीच्या काचा सगळ्या खोलून ठेवल्या होता आणि मस्त मस्त थंडी थंडी हवा अंगावर घेत होता आणि आम्हाला पण घ्यायला लावत होता. तन्मय जरा बुजलेला वाटत होता कारण आमच्याबरोबर त्याचा पहिलाच आउटिंग होते आणि त्यात सुमीत त्याच्या डोल्बी आणि मोठ्या भारदार आवाजात डिस्कशन करत होता. त्यामुळे तन्मय जरा जास्तच शांत होता. चांदणी चौक सोडून गाडी पुढे आली आणि आमच्या गप्पा रंगात आल्या . इकडचे तिकडचे चालू होते. तन्मयला भूक लागली होती मला पण चहा आणि धुम्रपान दंडिका घेण्याची इच्छा होती. पण इतक्या सकाळी कुठे काही मिळेल जरा शंका होती. शेवटी मुळशीच्या जवळ एक छोटेसे दुकान उघडे दिसले. आत एक "अण्णा" सारखा दिसणारा "अण्णा" झोपला होता. त्याला अण्णा म्हणून उठविले आणि "खायला काय आहे?" असे विचारले. तो आधीच साखरझोपेत होता , नक्कीच काहीतरी रोमांटिक स्वप्न बघत असणार , त्यात सका-सकाळी ५ ला कोण खायला मागत आहे असा विचार करून आमच्याकडे तारवटलेल्या डोळ्यांनि बघितले आणि परत चादर मुस्काटून घेयुन झोपला . निर्मनुष्य जागी आपले दुकान सताड उघडे ठेऊन निश्चित होऊन झोपलेला मी पाहिलेला पहिला माणूस ! पुण्यात अशी बेफिकीरी कुठेच बघायला मिळणार नाही . सुखी माणूस !! . त्याला परत "अण्णा हो" म्हणून उठवला आणि २ बिस्कट पुडे घेतले आणि पुढे निघालो.
एव्हाना हळू हळू पूर्वेकडे उजेड पसरू लागला होता. आमचे टेन्शन वाढु लागले होते. अजुन जवळपास २५ कि. मी. ( काटकर न्हवे !! ) जायचे होते आणि आत्ताच सूर्योदयची चिह्णे दिसू लागली होती. सकाळी सूर्योदयपूर्वी ५ ते 10 मिनिटे जो रंगाचा खेळ असतो त्यासारखी अद्भुत आणि अप्रतिम होळी कुठेच शोधून सापडणार नाही. आणि तीच होळी आम्हाला कॅमेरयाने ठरलेल्या त्या जलाशाजवळ टीपायची होती पण आम्ही वाटेवर असतानाच सूर्योदय होत होता . कहानी में थोडा ट्विस्ट केला आणि मुळशी धरणाला लागून जो रोड आहे तिथेच सूर्योदय घ्याचा असे ठरले . नेहमीप्रमाणे मी ट्राइपॉड आणला नाही . सुमीत आणि तन्मय ट्राइपॉड वर कॅमरा सेट करून क्लिक करत होते. मी रोडला लागुन असणार्‍या एका छोट्या टेकडीवर चढलो आणि तिथून ४/५ फोटो घेतले. पण ट्राइपॉड नसल्यामुळे फोटो मधे बराच ब्लर आला. मनातल्या मनात 'बेटर लक नेक्स्ट टाइम' म्हणालो आणि खाली आलो. एव्हाना बर्‍यापैकी 'उजेड' पडला होता. परत गाडीत बसलो आणि पुढे निघालो. 'इकडच्या तिकडच्या गप्पा मराठी आणि इंग्लीश मधून चालूच होत्या. मुळशी धरण सोडून पुढे आले की उजव्या साइडला पुलावरून एक फाटा आहे जो लोनवळयाला घेऊन जातो. इथून लोणावळा अंदाजे ४५ कि. मी. आहे. ह्या रोड ने पुढे निघाले की डाव्या हाताला एक मोठा आश्रम लागतो . मोठे लोक इथे येऊन योगोपासना वेगेरे करतात असे ऐकले होते. सुमीतने गाडी साइडला घेतली आणि आम्ही उगाचच आत जायचा काही चान्स आहे का हे तपासू लागलो. एक मोठ्या आकाराचे गेट होते . हिंदी पिक्चर मधे विकी शर्मा किंवा राहुल गुप्ता किंवा प्रेम सिंघानिया च्या बंगल्याला जसे गेट असते अगदी तसेच होते ते गेट. आत गेल्यावर वॉचमन दिसला . बाहेरचा होता. त्यामुळे हिंदीमधे बोलून त्याला 'खोपच्यात' घ्यायचा प्रयत्न केला. पण तो बेचारा, ड्यूटी का मारा होता हे त्याच्या बोलण्यावरून समजले आणि आत जाता येणारच नाही असे एकंदरीत स्पष्ट झाले . त्यामुळे गाडीत बसून पुन्हा आमच्या डेस्टिनेशन कडे निघालो .
विकीमापिया वरील माहितीप्रमाणे पुढे जवळच एक पठार आहे असे आधीच समजले होते. आणि तिथून कोंकण व्हॅली चा भन्नाट नजारा दिसतो एवढे नक्की होते. गर्द वनराई आणि त्यामधून जाणारा रस्ता आणि त्यात पहाटेची गुलाबी थंडी, बस्स आणि काय पाहिजे आयुष्यात असा विचार क्षणभर मनात आला , परत विचार केला अजुन आपल्याला बरेच काही करायचे आहे आणि ट्रान्स् मधे जाण्याचा मोह आवरला !!. सुमीत ने मधेच एक बॉम्ब टाकला त्याची म्हणजे त्याच्या कॅमेराची बॅटरी खतम होता आली आहे. शेवटचा एकच टॉवर दाखवत आहे. धन्य आहे रे !! त्याने कुठेतरी वाचलेले होते की बॅटरी गरम केल्यावर जरा जास्त वेळ चालते गाडीचा हीटर फुल्ल केला आणि बॅटरी त्याच्या समोर धरली , गुड आइडिया !! थोडे पुढे गेलो आणि ते पठार आले.. डाव्या हाताला..भरपूर मोठे पठार होते. शुमाकर च्या तोडिस तोड असा एक टर्न मारत सुमीतने गाडी पठारावर घेतली आणि आम्ही गाडीतून 'कॅमेरे' ट्राइपॉड आदी साहित्य घेऊन खाली उतरलो . पुढे जाउन जो काही निसर्गाचा काही कला अविष्कार आहे तो पाहून धन्य धन्य जाहलो . सह्याद्री च्या कणखरपणा , निसर्गाची शाल अंगावर घेउन सकाळच्या कोवळ्या उन्हात धुप खात बसला होता आणि आम्ही पामर त्याकडे बघत आमचे डोळे तृप्त करून घेत होतो. वॉव, सही, कूल, भन्नाट, मस्त, काटा, झकास असले टिपिकल फ्लिक्करचे कॉमेंट्स टाकत कॅमेरे सेट करून त्या भन्नाट निसर्ग अविष्काराचे फोटो काढू लागलो.सकाळचा कोवळा आणि सोनेरी प्रकाश सगळीकडे पडला होता आणि सगळे अगदी सोनेरी सोनेरी दिसत होते. अगदी ज्योनी लीवरला जरी तिथे उभा केला असता तरी तो पण १००%.सोनेरी दिसला असता. ही जागा बर्‍या पैकी उनटच्ड वाटत होती. इकडे तिकडे ऑब्जेक्ट शोधत क्लिक करणे चालूच होते. काही अप्रतिम लैंडस्कैप मिळाले. मेमोरी कार्ड भरत होते पण मन काही भरत न्हवते. इकडे तिकडे भटकताना तिथेच २/३मोकळ्या बाटल्या अर्थात मदिरेच्या दिसल्या आणि खात्री पटली की ही जागा उनटच्ड राहिली नाही. साले. एक जागा सुद्धा सोडत नाहीत. !! बरेचसे फोटो काढल्यावर परत गाडी स्टार्ट केली आणि पुढे निघालो. ज्या ठिकाणी जायचे होते ते अजुन आलेच न्हवते आणि आम्ही पामर पुण्यात न अनुभवायला मुळणारे सौंदर्य (निसर्ग) पाहण्यात इतके दंग झालो होतो की मै कौन हु, आत्मा क्या है असले प्रश्न उगाच मनात आल्यासारखे वाटत होते. आधे मधे मी आणि आणि तन्मय सिगरेटचा धुर टाकत होतो , सुमीत टिपिकल स्टाइल ने आम्हाला सांगत होता , सिगरेट बुरी बला है एट्सेटरा एट्सेटरा .... थोडे पुढे गेल्यावर एक छोटा तलाव दिसला तो खुपच छोटा होता. मनातल्या मनात पोपट झाल्यासारखे वाटले पण खात्री होती की 'ए "वो" नही' म्हणून. जरा पुढे गेल्यावर शेवटी एकदाचा तो तलाव दिसला.
आजपर्यंत फोटो मधे बघितलेला , शेवटी तो आमच्यासमोर होता. आणि त्याचे ते विस्तीर्ण स्वरुप आणि ते सौंदर्य पाहून फक्त वेड लागायची पाळी होती. गाड़ी पटकन साइडला लावली आणि आपापली एक्विपमेंट्स घेउन खाली उतरलो. सकाळचे कोवळे उन , मस्त बॅकग्राउंड ला डोंगर , शांत पाणी , आजुबाजुला गुरे चरत आहेत, अगदी स्वर्गीय नजारा होता . मनात परत विचार आला 'आणखी काय पाहिजे ' ? परत त्या विचाराला थांबवले 'अजुन बरेच काही करायचे आहे :) !!' . डोक्यात बरेचशे कोम्पोसिशन , फ्रेम , आर्टिस्टिक फ्रेम, लैंडस्कैप होते ते कैमरा मधे उतरून घेऊ लागलो . जवळ पास अर्धा एक तास कसा गेला ते समजले नाही. बरेचशे चांगले फोटो मिळाले . एक १२/१३ वयाचा मुलगा हातात काठी आणि बरोबर एक छोटासा कुत्रा घेउन गुरे चरावयाला निघाला होता. त्याला सुमित ने थांबवले , सुमितचा डोल्बी टाइप आणि भारदार आवाज़ ऐकून थांबला तो. आमच्या हातात क्यामेरे बघून तो पण उत्सुक दिसला . त्याला मग सुमितने असे उभा रहा , तसे उभे रहा , असे म्हणत फोटो काढले. मी पण लो एंगल ने त्याचे काही फोटो घेतले . छान मिळाले. असतील नसतील तेव्हढे ऑब्जेक्टस शोधून शोधून त्याना चुन चुन के शूट केले . बरयापैकी फोटो काढल्यावर मनात नक्की ठरवले की हा स्पॉट एक शूट मधे कव्हर होणारा नाही . इथे परत आलेच पाहिजे. शहरातला आमच्यासारखा माणूस असल्या श्रूष्टिसौदर्याला खरच पोरका झाला आहे. त्याला असल्या जागी नेउन सोडला की तो नक्कीच वेडापिसा होतो हयात शंका नाही . मनातल्या मनात परत यायचे प्लान्स ठरवत गाड़ी परत घेतली . वाटेवर मुळशी धरणाजवळ एका नामांकित होटल कम रिसॉर्ट मधे (काही पण रेट असणारे (चहा १० रुपये) ) थोड़े खाउन घेतले आणि परत वाटेला लागलो . सीमेंट कांक्रीट च्या जंगलात जायला . तेच ट्रैफिक , तेच प्रदुषण , तीच रस्साखेची.... पुढच्या वीकएंड पर्यंत .... !!