Tuesday, November 10, 2009

जेजुरी फ़ोटो शुट !!!

नेहमीप्रमाणे वीकेन्ड साठी क्लिकेबल जागा शोधने चालु होते. दिनेश सरानी मागे एकदा जेजुरी चे नाव सुचविले होते. सुमीत ने पण तेच नाव सुचविले . विकास ने पण तेच नाव घेतले( लग्नात घेतात ते न्हवे ! ) शेवटी तेच ठरले, दोन Nikonians बोलल्यावर एक canonian काय बोलणार बिचारा. दिनेश सराना मेल टाकला. पण ते दुसरीकडे बिझी असल्यामुळे नंतर कन्फर्म सांगतो म्हणाले. तन्मय जिवाची मुंबई करण्यासाठी जाणार होता त्यामुळे त्याचे रद्द झाले. संजिथ आका सन्चु पण येणार होता. पण ११ व्या तासाला तो "drop out" झाला असे विकास म्हणाला , मला "knock out" झाला असे ऐकु आले. शुक्रवारी किंवा शनिवारी कधी कधी मला असेच वेगळे ऐकु येते.... !! असो. भुलेश्वरला या वीक मधे पण नाही ठरले :( . बेटर लक नेक्स्ट टाइम !!

रविवार चा दिवस ठरला. नेहमी प्रमाणे भल्या पहाटे जायचे ठरले. ऎवढी एक चांगली सवय लागली आहे. लवकर उठ्ण्याची ....! आमचा एक नियम आहे. जो पहिला उठतो त्याने सगळ्याना फोन करुन उठ्वायचे आणि ह्यावेळी चक्क मी उठलो होतो, सगळ्याना फोन टाकला. सुमित डायरेक्ट सासवड मधे येणार होता. विकास ठरल्याप्रमाणे उशिरा आला आणि आम्ही सासवड च्या दिशेने कोंढवा मार्गे निघालो. ठरलेल्या ठिकाणी सुमित थांबला होता. साहेब आज एकदम "चकोट" मधे आले होते. कुर्ता आणि पायजमा घालुन. राजकुमार जणू !! , आम्हि आपले तसेच उठुन सापडेल ते अंगावर घालुन आलो होतो. मावळे दिसत होतो. :) . सुमितची कार तिथेच पेट्रोल पंप जवळ लावली आणि निघालो. थंडी काहीच जाणवत न्हवती, दिवे घाट पार केला. अजुन सुर्योदयाला भरपुर अवकाश होता. काहीच दिसत नसल्यामुळे घाटातुन मस्तानी (तलाव !! ) दिसण्याची शक्याताच न्हवती. त्यामुळे पुढे निघालो. मि एकटा Canon वाला असल्यामुळे हे दोघे फ़ार्मात होते. मि अगोदरच " Nikon is great camera !!" म्हणुन विषय मिट्वुन टाकला. (परत सापडालच बेट्यानो !!)

"ईकड्च्या तिकड्च्या" गप्पा मारत जेजुरी पर्य़न्त पोहोचलो. तिथेच एका चहाच्या टपरीत चहा आणि बिस्किट घेतले. होटलवाल्याकडे बघितल्यावर मला मुळशि चा 'आन्ना ' आठवला . पान हां बरया पैकी ' सिरिअस आन्ना' दिसत होता. पुर्वेकडे हळु हळु रंगछटा यायला चालु झाल्या होत्या. पट्कन गाड़ी पार्क करुन मंदिरात जाण्यासाठी वर चढु लागलो. गर्दी नसेल असे वाट्ले होते पण भरपुर भाविक लोक होते. वातावरण एकदम मंगलमय आणि प्रसन्न होते. पुर्वेला तसे भरपुर ढग होते त्यामुळे सुर्योदय निट मिळेल का नाहि ही चिंता होतीच . १० मिनिटात पायरया चढून मंदिरात पोहोचलो.

सकाळच्या प्रसन्न वेळी लाउड स्पिकर वर आरती लावली होती. सुर्यौदय , आरती, ’येळकोट येळकोट जय मल्हार ’ चा जयघोष , हया सर्व गोष्टींमुळे अगदी भारावुन गेल्यासारखे गेलो होतो. मन एकदम प्रसन्न झाले होते. घरुन तसेच उठुन आल्यामुळे लांबुनच पायरीला हात लाउन पाया पड्लो. माझ्या मते मनात भक्ति असेल तर तुम्हाला मंदिरात गेलेच पाहिजे असे काहि नाही. अर्थात्त ज्याच्या त्याच्या मानन्याचा प्रश्न आहे.

एव्हाना सुर्योदय झाला होता, ढग होतेच पण त्यामुळे किरणांच्या छटा आणखीनच सुंदर दिसत होत्या. पहिल्यादा १८-५५ म.म. (18-55mm ) ने मंदिराचे काही फोटो काढ्ले. ह्या मंदिराच्या चहुबाजुंनी तट्बंदी आहे आणी मंदिरातुन वरती जाण्यासाठी अरुंद असे बोळ आहेत. त्यातुन जाताना अगदी पुरातन काळात गेल्यासारखे वाट्ते. तट्बंदी वरुन चोहोबाजुचा अप्रतिम नजारा दिसतो. पुर्वेला सुर्य रंगांची उधळन करत होता आणि बाजुला दोन भगवे ध्वज दिमाखात फ़डकत होते. मंदिरच्या उत्तर-पुर्व दिशेला मल्हार सागर नावाचे मोठे धरण आहे आणी पुर्व-दक्षिणेला श्रीमंत बाजीराव पेशवे तलाव आहे. तसेच मंदिराच्या उत्तरेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तलाव आहे. तट्बंदीवरुन मंदिराला पुर्ण प्रदक्षिणा घालता येते. सुर्योदय झाला होता. आम्ही तिघेही जण फ़ोटॊ काढण्यात मश्गुल झालो होतो. काहि भन्नाट फ़ोटो मिळाले. तट्बंदीवर जवळपास अर्धा तास घालवल्यावर खाली आलो .



भाविकांची गर्दी हळु हळु वाढत होती. भंडारा हवेत उधळला जात होता. मधेच मोठय़ाने ’येळकोट येळकोट जय मल्हार ’ चा जयघोष होत होता. सुमित आत जाउन दर्शन घेउन आला . विकास त्याच्या नविन घेतलेल्या स्ट्रोबचे टेस्टिंग एका लहान मुलावर घेत होता. त्याचे रिझल्ट्स चांगले आलेले पाहुन मी आणी सुमितने हे नविन 'हत्यार' आमच्या Wshlist मधे (मनात नसताना ) टाकुन दिले. फोटोग्राफ़ी मधे हाच प्रोब्लेम आहे, नविन equipmemts ची भूक काही सरत नाही .

आता ५०म.म. (50mm prime) ने थोडे पोर्ट्रेट काढावे असा विचार केला .गर्दी वाढतच होती . मधेच एका आजीबाईनी विकासला विचारले. "एका फोटॊचे किती रुपये घेणार आणि किती वेळात फोटो देणार ? ". "नाही हो आजी मी तसला फोटोग्राफ्रर नाहिये !! मि छंद म्हणुन फोटोग्राफ्री करतॊ ! " विकास चे उत्तर . आजीबाई आमच्याकडे बघत म्हणाल्या " अच्छा ठिक आहे मी त्यांना विचारते !!". त्यावर विकास म्हणाला "ते सुद्धा माझ्याबरोबरच आले आहेत !!"....



बरेचशे पोर्ट्रैट मिळाले . एव्हाना बराच लाईट झाला होता. त्यामुळे खाली उतरायचे ठरले. खाली येताना फ़ोटोगिरि चालुच होती. वाटेत बरेचशे "So Called-photographers" दिसले जे फ़ोटो काढुन एक मिनिटात फोटो प्रिंट करुन देत होते. फ़क्त्त २० रुपयात. आयडिया छान आहे ... !! खाली आल्यानंतर एका छोट्याश्या होटेल मधे थोडी पोट्पुजा केली . पुढ्च्या वीक डेस्टीनेशन बद्दल ठरवु लागलो. अजुन पर्यत तर काही ठरले नाही. मार्केट मधे थोडा वेळ घालवला आणि थोड्या वेळाने परतीचा प्रवास चालु केला.

नेहमीप्रमाणे आमच्या बात्या चालुच होत्या. दिवे घाटात थोडा वेळ थांबुन फ़ोटॊ काढ्ले. वारकरी लोकांचे जथ्थे होते जे आळंदीला निघाले होते. परत पुढ्च्या वीक चे प्लनिंग करत करत परतीचा प्रवास चालु केला . एकंदरीत छान बाईट्स मिळाले होते ह्या फोटोशुट मधे.


ज्याना
३/४ तासाचे quick फोटोशुट करायचे आहे अशांसाठी जेजुरी हा उत्तम पर्याय आहे. wikimapia वरील जेजुरी चे लोकेशन खालीलप्रमाणे आहे.
http://wikimapia.org/#lat=18.2725124&lon=74.1605043&z=16&l=0&m=b

पुन्हा भेटूच ...!!

1 comment:

  1. ek number re bhava.. !!
    Agadi darshan zalyasarkhe vatale. photo pan chaan aahet.

    Sandeep

    ReplyDelete