अजुन सुर्योदयाला फ़ार वेळ होता. ह्डपसरच्या बाहेर आल्यावर चहा घ्यायचे ठरले. वाटेवर एका टपरी मधे चहा घेतला आणि निघालो. बोलता बोलता वाटेमधे जे "कावडी" नावाचे गाव आहे तिथे अगोदर जायचे ठरले . भुलेश्वरचे मंदिरामधे इतक्या लवकर जाउन काही उपयोग न्हवता कारण तिथे मंदिरामधे फोटोग्राफ़ी करायची तर भरपुर लाइट पाहिजे म्हणुन कावडीमधे सुर्योदय घ्यायचा ठरले आणि नंतर भुलेश्वर ला जायचे ठरले. पहिल्या टोल नाक्यावरुन पुढे गेल्यानंतर लेफ़्ट ला "कावडी" साठी फ़ाटा आहे. रजनीकांत स्टाइल ने टर्न मारत (होय शुमाकर लाजुन आता रिटायर झाला !!!! ) सुमितने गाडी कावडी च्या रोडला घेतली. त्या रोड ला दुतर्फ़ा उसाची आनी ईतर शेते असल्यामुळे थोडी जास्त थंडी जाणवली. घनदाट धुके आहे याचा अंदाज लगेचच येत होता. थोडे पुढे गेल्यावर रेल्वे क्रासिंग होते आणि नेमकी कुठली तरी रेल्वे जाणार असल्यामुळे फ़ाटक बंद होते. मौका आमच्याकडे चालुन आल्यावर आम्ही चौका मारायचे थोडेच राहणार होतो. पटापट आपापली ईक्विपमेंटस आणि ट्रायपोड्स घेउन खाली उतरलो. इथुन रेल्वेची ड्बल लाईन होती आणी नुकतेच पांढरे पट्टे आणि कलरींग केल्यामुळे ते लाईनमनचे छोटेसे घर आणि रेल्वे ट्रक फ़ारच सुंदर दिसत होते. अगदी "करण जोहर" च्या पिक्चर मधील द्रुश्य शोभत होते... उगाचच ईकडे तिकडे बघुन "शाहरुख खान" नसल्याची खात्री करुन घ्यावीशी वाटली. गाडी यायला भरपुर वेळ होता असे तो लाईनमन म्हणाला. दोन्हि ट्रक च्या मधे ट्रायपोड्स सेट करुन त्यावर आमचे कँमेरे लाउन रेल्वे यायची वाट पाहु लागलो. त्याअगोदर थोडे टेस्ट फ़ोटो घेतले. पुर्वेला बरोवर दोन्ही ट्रँकच्या मधे चंद्रकोर दिसत होती. ट्रकवर दुरवर एक सिग्नल होता. अगदी छान नजारा होता. लाईट फ़ारच कमी असल्यामुळे लो शटर स्पीड ला फ़ोटो काढावे लागणार होते. ३० सेकंद शटर स्पीड ठेउन काही फोटो घेतले. अगदी मनासारखे आले. थोड्या वेळाने रेल्वे आली आणि आम्ही त्याचे काही फ़ोटो काढ्ले. अगदी निट आले.

नदीवरचे धुके हटायला तयार न्हवते , दुरून वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत होते.मला तर सगळे पक्षी बदकच आहेत असा भास होत होता. काहीतरी विचित्र आवाज काढत होते. ते ऐकुन विकास ने तो आवाज कशाचा असु शकेल याचा अंदाज केला आणि हसुन हसुन पुरेवाट झाली ,अर्थातच ते इथे सांगणे उचीत असनार नाही. आमचा हास्याचा गडगडाट ऐकुन गावक-यांची भुताखेताविषयीची समजुत आणखी द्रुढ झाली असणार ह्यात काहीच शंका नाही.


तिथून पुढे निघालो . सोलापुर रोड ला लागलो. नील पन आता चांगलाच मिसळला होता. माझा आणी त्याचा "छंद" मँच झाल्यामुळे आमचे तर अगोदरच जमले होते. हाईवे असल्यामुळे सुमितला एक नवा उत्साह चढला होता आणि गाडी १०० ने तरी पळवत होता... !! वाटेत खामगाव मधे थांबुन थोडे स्नँक्स आणी चहा घेतला आणी परत निघालो. आता आमचे "अँबस्ट्रँक्ट फ़ोटॊग्राफ़ी" मधे काय काय येउ शकते याबद्द्ल डिस्कशन चालु होते आणी हसुन हसुन पुरेवाट होत होती. काही "ओले" विषय साथीला होतेच त्यात भर टाकायला... रस्ता थोडा खराब होता पन सुमित सफ़ाईदारपणे गाडी घेत होता(!!). भुलेश्वर च्या मंदीराजवळ आलॊ आणी एका कटाक्षात मंदिराची भव्यता समजुन आली. मंदिराचा पसारा पुर्व- पश्चिम असा अवाढव्य होता. त्यावरचे कळसच मंदिराच्या भव्यतेची साक्ष देत होते. आज रविवार असल्यामुळे थोडि गर्दी असेल असा अंदाज होता पण अजुन तरी कोणी दिसत न्हवते. नेहमी प्रमाणे एक ’अण्णा’ त्याच्या टपरीची कम होटेल ची मांडणी करत होता. तो आत्ताच आला होता असे दिसले. आकाशात थोडेसे ढग होते आणि त्यामुळेच कि काय उन जास्त हार्ष(!) वाटत न्हवते. मंदिराच्या मागे एक बी.एस.एन.एल. चा टाँवर होता. तिकडे गेलो. तिथे कुणीतरी कर्मचारी असेल तर त्याची परवानगी घेउन टाँवरवर चढुन काही फ़ोटो काढावे असा बेत होता. पण खाली ज्या ३/४ खोल्याची बिल्डिंग होती तिला कुलुप होते. आणी ते चांगलेच गंजलेले दिसत होते . ह्याचा अर्थ इथे कुणीही नसणार हे ग्रुहित धरुन आम्ही टाँवर च्या दिशेने गेलो. नंतर कळाले कि हा टाँवर बंद पड्लेला आहे आणी बि.एस.एन.एल ला त्याची काही गरज न्हवती. म्हनुण तो गंजण्यासाठी सोडुन देण्यात आला आहे. भोंगळ सरकारी कामाचा एक आदर्श नमुना !!!


भंगलेल्या अवस्थेतील त्या मुर्त्या पाहुन फ़ार वाईट वाटले. पण त्या मुर्त्या अजुन खुपच सुंदर दिसत होत्या. विशेष म्हणजे जवळपास सर्वच मुर्त्या एकाच प्रमानाच्या व अगदी रेखिव होत्या. वेगवेगळे फ़्रेम्स , कँपोझिशन्स , अँगल्स लाउन बरेचशे फ़ोटो काढले. त्यात सुर्याची किरणे मंदिरात पडत होती आणी क्षणाक्षणाला वेगवेगळे कँपोझिशन्स मिळत होते. ५० मि मि लेन्स असल्यामुळे अगदी अप्रतिम फ़ोटॊ मिळत होते. फ़ोटॊ काढत काढत मंदिराला दोन फ़े_या मारल्या पण मन काही भरत न्हवते. प्रत्येक वेळी नविन काहीतरी मिळाल्याचा आनंद होत होत. तिस_या फ़ेरिला १८-५५ मि मि चि लेन्स लावली आणि लो अँगल ने काही फ़ोटो काढत परत एक पुर्ण फ़ेरी मारली.

माझी पक्की खात्री झाली की इथे दिवसभर जरी थांबलो तरीही प्रत्येक वेळी नविनच फ़ोटॊ मिळेल. दिवसभर सुर्यकिरणांचा हा खेळ चालुच राहील. जवळपास २ तासांच्या फ़ोटोशेषन नंतर लक्षात आले कि बाकिची मंडळी गायब आहेत. बाहेर आल्यानंतर समजले कि सगळी वरतीच आहेत. परत वर जाउन काही लँन्ड स्केपस घेतले. बर-याच वेळाने मंदिरच्या बाहेर आलो. त्या अण्णाला भेळ आणी चहा सांगितले आणि थोडा वेळ रेस्ट करत बसलो. मागच्या वेळी जेजुरीला जसे १ मिनिटात फ़ोटो काढुन देनारे होते तसाच एक इथे पण भेटला. इंट्ररेस्टींग माणूस होता.
पोटपुजा झाल्यानंतर परत टाँवर च्या दिशेने निघालो. कसेबसे करुन वरच्या पाय-या पर्य़न्त जरी पोहोचलो तरी पुढ्चे काम एवढे अवघड वाटत न्हवते. त्या बिल्डिंगपासुन टाँवर पर्यन्त लोखंडी पिलर टाकले होते आणी तोच एक रस्ता होता २०/३० फ़ुट वर असणा-या पाय-यापर्यन्त जाण्याचा. वरती चढावे का नको असे करत करत शेवटी मनाचा निर्धार केला आणि मि वर जाण्याचा निर्णय घेतला. मला खात्री होती वर जाउन जे काही फ़ोटोज मिळातील ते भन्नाटच असणार.
"सेफ़ लाईफ़ जगण्याच्या नादात आपन ब-याचदा असले थ्रिल अनुभवायला कचरतो आणि जगणे मिळमिळीत करुन टाकतो". अर्थात हा माझा विचार आहे. तुमचे विचार असाच असला पहिजे असे काही नाही. तसेही झाडावर चढुन किंवा असले उद्योग करुन बरेच वर्ष झाली होती. त्यामुळे लहानपनीचे असले प्रसंग आजहि नजरेसमोर तरळतात आणी आपण उगाच मोठे झालो वैगेरे वैगेरे असे विचार मनात येतात. शेवटी मनाचा हिय्या करुन जँकी चेन स्टाईलने खिड्क्यावरुन बिल्डींगवर चढलो. खालुन हे तिघे "मोरल सपोर्ट" देतच होते. :) . बिल्डींगपासुन टाँवर १०-१५ फ़ुट असेल. दोन मोठे अँगल च्या साहाय्याने शेवटी त्या पाय-यापर्यन्त पोहोचलो. कपड्यांची वाट लागली होती. अर्थात ते ग्रुहीत धरुनच मिशन वर निघालो होतो. एकदाचे पाय-यापर्यन्त पोहोचलो आणि आता काय सगळे सोपे आहे या अविर्भावत एक एक पायरी चढु लागलो. थोडे वर गेल्यानंतर बाजुला एक प्लँटफ़ाँर्म केलेला दिसला. थोडी दमछाक झाली होती म्हनून २ मिनीटे रेस्ट कराबे असा विचार केला. खाली पाहिले आणी त्या क्षणी मी जी काही स्टंट्बाजी करत होतो त्याचा अंदाज आला.
खाली हे "त्रिमुर्ति पथक" माझा आत्मविश्वास वाढवत होते. आणि मि त्या जोरावर वर चाललो होते. नाहि म्हणाले तरी मनात थोडी भिती वाटत होतीच. टाँवर सुस्थितित असेल का ? भुंकंप झाला तर ? कुणी बि.एस.एन,एल, चा कर्मचारी तर नाही ना येनार?. असे बरेच काही डोक्यात येत होते.तसा आमचा स्वताबद्द्लचा अनुभव हा फ़ारसा चांगला नाही. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकानी हजर राहणा-यांच्या यादीत माझा पहिला नंबर आहे असा माझा ठाम विश्वास आहे. :) . त्यामुळे ऐन वेळी काही पोपट होऊ नये एवढीच माझी इच्छा होती. एकदा वर बघितले आणि परत ठरवले आता इथेपर्यत आलो आहेच तर एकदाचे काम फ़त्ते करुन टाकु.
असे समजा कि मि जवळपास दुस-या मजल्यावर होतो. आणी ज्या प्लँटफ़ाँर्म पर्यन्त जायचे होते तो जवळच दिसत होता. परत वरती जाण्यास सुरुवात केली. हे अंतर दिसायला जरी जवळ असले तरी जवळपास १० ते ११ व्या मजल्यापर्यंतचे होते हे परत समजले. हळु हळु सावधपणे एक एक पायरी हाताने निट ओढुन तपासत होतो आणी मगच वर पाउल ठेवत होतो. अधुन मधुन मंदिराकडे आणी खाली तिरका कटाक्ष टाकत होतो. एव्हाना मी ही जी काही स्टंट्बाजी करत होतो त्याची व्याप्ती दर पावला पावलाला माझ्या लक्षात येत होती. हवा टाईट होणे... !! नानी याद आणे !! असले तत्सम वाक्प्रचार माझ्या मनात उगाचच डोकावुन मला वाकुल्या दाखवत आहेत असे वाटत होते.
शेवटी एकदाचा तिथे पोहोचलो आणि सुट्केचा निश्वास टाकला. मनात इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला ’माउंटन ड्यु’ ची सुद्धा गरज लागत नाही. एकदा सभोवतालचे रमणिय द्रुश्य पाहुन त्या प्लँटफ़ाँर्मवरुन सावधपणे चालत मंदिराच्या बाजुला गेलो . प्लँटफ़ाँर्म जेमतेम दिड फ़ुट रुंद आणी पाच फ़ूट लांब असेल. फ़टाफ़ट ७/८ फ़ोटो काढले आणि परत फ़िरलो.
शेवटी एकदाचा तिथे पोहोचलो आणि सुट्केचा निश्वास टाकला. मनात इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला ’माउंटन ड्यु’ ची सुद्धा गरज लागत नाही. एकदा सभोवतालचे रमणिय द्रुश्य पाहुन त्या प्लँटफ़ाँर्मवरुन सावधपणे चालत मंदिराच्या बाजुला गेलो . प्लँटफ़ाँर्म जेमतेम दिड फ़ुट रुंद आणी पाच फ़ूट लांब असेल. फ़टाफ़ट ७/८ फ़ोटो काढले आणि परत फ़िरलो.

कँमेरा खांद्यावरुन मागच्या साईड्ला टाकला. आणि परतीचा प्रवास चालु केला. चढण्यापेक्षा उतरताना जास्त त्रास होत होता. कारण पाय गुढग्यातुन दुमडुन खालच्या पायरीवर जावे लागत असल्यामुळे ते थोडे त्रासदायक होते. मनासारखे फ़ोटो मिळाले तर होतेच पण त्यापेक्षा जास्त अजुन आपण रेस मधे आहे, याचाच आनंद जास्त होता. खालुन हे सपोर्ट देतच होते. एक एक पायरी करत करत शेवटी एकदाचा खाली आलो. अँगल वरुन सावकाश खाली उतरलो आणी मिशन निट पार पाड्ले याचा आनंद झाला. तिघेजण फ़ोटो पाहुन खुष झाले . पण वरती जाण्याबद्दल त्यांची मनस्थिती द्विधा होती. जाण्याची इछ्चा तर तिघांचीही दिसत होती. शेवटी सुमित वरती चढला. आनी सावकाशपणे जवळपास दुस-या मजल्यावर असणा-या प्लँटफ़ाँर्मवर जाउन थांबला. नंतर नील आणि विकास ला पण स्फुरण चढले. ते पण वरती गेले. विकासने मात्र मी जिथेपर्यंत गेलो होतो तिथेपर्यंत जाउन फ़ोटो काढ्ले आणी निट परत आला. हे मंदिराचे फ़ोटो जे वर जाउन काढले होते ते कंपोझिशन फ़क्त मी आणि विकासच्या कडेच आहे हा विचार पण काही कमी सुखावणारा न्हवता. एकंदरीत फ़ारच थ्रिलिंग एक्स्पिरियंन्स होता तो. पुढे कधितरी ह्याच स्पाँट वरुन सुर्योदय घ्यायचा असे पण ठरले.
एव्हाना दुपारचे २ तरी वाजले असतील. एकंदरीत ह्या फ़ोटोशुट मधे भन्नाट मजा आली होती. परत एकदा लवकरच इकडे यायचे नक्की करुन परतीचा प्रवास सुरु केला.....!!
KP..Sakali late aalas leka (nemahipramane) te lihayala visaralas ki kaaay???? :-)Pan trip mast zali...! Parat nakki jau :-)
ReplyDelete:) parat gelech pahije !!
ReplyDeletemazi "ti" film shodhali pahije aata.
ReplyDelete